नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्र. अर्ज कुठून भरता येईल ?
 
उ. Internet असलेल्या संगणकाद्वारे अर्ज भरता येईल. संकेतस्थळावर दिलेल्या “Apply Online“ येथे क्लिक करून अर्ज भरता येईल.
 
प्र. मी सदर पदा साठी पात्र आहे का?
 
उ. जाहिरातीतील पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयाचे निकष इत्यादी तपासून उमेदवारास त्याची पात्रता ठरविता येईल. 
 
प्र. एका email id द्वारे एका पेक्षा जास्त अर्ज करू शकतो का?
 
उ. नाही, एका email id द्वारे फक्त एकच अर्ज भरता येईल. दुसरा अर्ज भरण्याकरीता नवीन email id चा वापर करावा.
 
प्र. Login id / password कुठून मिळवावा ?
 
उ. Registration केल्यानंतर login id आणि password तयार होतो त्याची प्रिंट काढुन जतन करून ठेवावी. तसेच login id आणि password बँकेच्या परीक्षा शुल्क चलनावर खालील बाजूस छापलेले असते.
 
प्र. Photo Signature उपलोड होत नाही?
 
उ. स्कॅन केलेले स्वतःचे अद्यावत ३.५ से.मी.  x ४.५ से.मी.  आकारतील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे छायाचित्र अपलोड करावे. ईमेज साईज १५० kb पेक्षा जास्त नसावा व उमेदवाराने काळ्या शाईच्या पेनने स्वतः स्वाक्षरी करून स्कॅन केलेली १.५ से.मी.x ३.५ से.मी. आकारतील  “JPG/JPEG/BMP” या प्रकारची स्वाक्षरी (Signature)  अपलोड करावी. ईमेज साईज १५० kb पेक्षा जास्त नसावा.  
 
प्र. ऑनलाईन अर्ज भरण्या करिता किती वेळ लागतो?
 
उ. साधारणपणे १०-२० मिनिटे कालावधी एक अर्ज भरण्यासाठी लागतो.  त्यासाठी अर्ज भरावयास सुरवात करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे / माहिती तसेच Photo Signature च्या ईमेज सोबत ठेवाव्यात.
 
प्र. अर्ज submit केल्या नंतर अर्जात काही बदल असल्यासते करता येईल का?
 
उ. नाही, एकदा अर्ज submit केल्या नंतर अर्जात बदल करता येत नाही. अर्जाचा Preview काळजीपूर्वक वाचून verify केल्या नंतरच submit करावा.
 
प्र. अर्ज भरल्या नंतर परीक्षा शुल्क त्याचदिवशी बँकेत भरता येईल का?
 
उ. नाही, अर्ज भरल्या नंतर कार्यालयीन एक दिवसानंतर परीक्षा शुल्क बँकेत भरता येईल. (सुट्टी चे दिवस वगळून)
 
प्र. बँकेत परीक्षा शुल्क भरल्या नंतर लगेच अर्जाची प्रिंट काढता येईल का?
 
उ. नाही, परीक्षा शुल्क भरल्या नंतर दोन दिवसांनी अर्जाची प्रिंट काढता येईल.(सुट्टी चे दिवस वगळून)
 
प्र. लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करता येईल का?
 
उ. होय, केवळ संकेतस्थळावरूनच लेखी परीक्षेचे ई-प्रवेश पत्र प्राप्त करता येईल.
 
प्र. ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर लेखी परीक्षे करिता पात्र होईल का?
 
उ. नाही, ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर परीक्षा शुल्क बँकेत जमा केल्या नंतरच उमेदवार प्राथमिक स्वरुपात परीक्षा करिता पात्र होतो.
 
__________/\_________